Friday, February 25, 2011

झोपाळा

एक होता झोपाळा.नावाप्रमाणेच तो कायम झोपायचा. एका बागेत दुपारी व रात्री झोप काढायचा.एके दिवशी तो झोपला होता. वेळ होती दुपारची. नेहमीप्रमाणे तो झोपलेला असतानाच तिथे काही मोठी मुले आली. ती येऊन बसली त्या झोपाळ्यावर. वयमर्यादा ८ वर्ष असतानाही ती मुले (वय ९-१० वर्ष) त्या झोपाळ्यावर बसली.आधी तो सहन करत होता. पण नंतर जेव्हा ही मुले जोरजोरात झोके घेऊ लागली तेव्हा काही झोपाळ्याला सहन झाले नाही. तो स्वतःलाच म्हणाला, "ही मुले पण ना,एकतर झोपमोड करतात वर वायामार्यादेत नसतानाही माझ्यावर बसतात, त्यांचं वजन पण ना, मी तुटीन." शेवटी त्याचा पार चढला व त्याने जोरण त्या मुलांना ढकलून दिलं. सर्व मुले घाबरून पळून गेली व झोपाळा झोपून गेला. असा होता हा झोपाळू  झोपाळा.

Sunday, March 28, 2010

सचिन तेंडुलकर


गंभीर आउट झाला म्हणून
सचिन आला खेळात
आफ़्रिकेला अड्कवले त्याने
षट्कारांच्या जाळ्यात
नंतर चौकार मारुन त्याने
दमवले अफ़्रिकेला
खेळात रंगत आणुन त्याने
विश्वविक्रम रचला
२०० धावा झाल्यावर
आफ़्रिकेला घाम फुट्ला
गीब्स म्हणाला तू तर
धावांचा डोंगर रचला
अशा खेळाडुचा मला
अभिमानच वाटतो
कोणीही समोर असले तरी तो
षटकारच मारतो