Friday, February 25, 2011

झोपाळा

एक होता झोपाळा.नावाप्रमाणेच तो कायम झोपायचा. एका बागेत दुपारी व रात्री झोप काढायचा.एके दिवशी तो झोपला होता. वेळ होती दुपारची. नेहमीप्रमाणे तो झोपलेला असतानाच तिथे काही मोठी मुले आली. ती येऊन बसली त्या झोपाळ्यावर. वयमर्यादा ८ वर्ष असतानाही ती मुले (वय ९-१० वर्ष) त्या झोपाळ्यावर बसली.आधी तो सहन करत होता. पण नंतर जेव्हा ही मुले जोरजोरात झोके घेऊ लागली तेव्हा काही झोपाळ्याला सहन झाले नाही. तो स्वतःलाच म्हणाला, "ही मुले पण ना,एकतर झोपमोड करतात वर वायामार्यादेत नसतानाही माझ्यावर बसतात, त्यांचं वजन पण ना, मी तुटीन." शेवटी त्याचा पार चढला व त्याने जोरण त्या मुलांना ढकलून दिलं. सर्व मुले घाबरून पळून गेली व झोपाळा झोपून गेला. असा होता हा झोपाळू  झोपाळा.